कळंब : कन्हेरवाडी (ता. कळंब) येथील विवाहितेस घरातून तिघांनी अंगावर कपडा टाकून व तोंड दाबून उचलून नेऊन ऊसाच्या शेतात बलात्कार केल्याप्रकरणी तिघांविरूद्ध कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. 24 नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता घडली. आरोपींच्या शोधात पोलीस पथक रवाना झाले आहेत.
बाबा समींदर शिंदे, दादा समींदर शिंदे व समींदर रामा शिंदे (सर्व रा.ढोकी, ता. जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. कन्हेरवाडी येथील विवाहित महिला मुलाबाळासह २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या घरात झोपल्या होत्या. यावेळी वरील आरोपींनी तिच्या घराची कडी वाजविली. या महिलेने घराचा दरवाजा उघडताच या तिघांनी तिला उचलून जवळच्या उसाच्या फडात नेले व तेथे बाबा शिंदे याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच सदर महिलेस जिवे मारण्याची धमकी देऊन तिला तिघांनी बळजबरीने रिक्षात बसवून ढोकी येथील हका खोलीत डांबून ठेवले. या महिलेच्या पतीने व इतरांनी शोध घेऊन तिला ढोकी येथून २५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले.
याबाबत सदर महिलेने कळंब पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून बाबा शिंदे, दादा शिंदे व समिंदर शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास फौजदार एम.एन.शेळके करीत आहेत.