उस्मानाबाद : लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने अयोजीत सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळ्यात गुरुवार रोजी ५० जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. गुरुवार दि. 28 नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी ६.१५ मिनिटांनी मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा शहरातील पोलीस मुख्यालय क्रिडा मैदानावर पार पडला.
      लोकमंगल प्रतिष्ठाणच्या वतीने जरवर्षी सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी यावर्षी लोकमंगल प्रतिष्ठाणचे नाव बदलुन लोकमंगल फाउंडेशन हे करण्यात आले. यावर्षी विविध जातींच्या ५० जोडप्यांच्या रेशीमगाठी लोकमंगलच्या वतीने जोडण्यात आल्या. गेल्या दोन दिवसापासून या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली होती. आज सकाळ पासूनच जिल्हाभरातील नाव नोंदवलेली जोडपी या विवाह स्थळाकडे दाखल होत होती. या नव वधु-वरांचे स्वागत लोकमंगलचे पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी केले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सर्व वधु-वरांची रिक्षामधुन वरात काढण्यात आली. शहरातील विविध भागातुन अतिशय नियोजनबध्द पध्दतीने वरात काढण्यात आली.
      त्यांनंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व वधु-वर पोलीस मुख्यालय क्रिडा मैदानावर आल्यानंतर भव्य मांडवामध्ये माजी खा. सुभाष देशमुख, लोकमंगलचे कार्याध्यक्ष रोहन देशमुख, माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, आ. ओमराजे निंबाळकर यांच्यासह विविध मान्यवर यावेळी वधुवरांना अर्शिवाद देण्यासाठी उपस्थित होते. मोठ्या थाटात या जोडप्यांचे विवाह लावण्यात आले.
      या विवाहसाठी सुमारे ५० हजार व-हाडी आले होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. विवाहानंतर मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. हा विवाह सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी लोकमंगल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्‍यांनी परिश्रम घेतले.
 
Top