कळंब (बालाजी जाधव) -: अवघ्या चोवीस तासांच्या आत हरवलेल्या मुलाचा शोध घेणा-या कर्तव्यदक्ष पोलीसांचा सत्कार राणाजगजितसिंह पाटील युवा प्रतिष्ठाण कळंब शाखेच्यावतीने करण्यात आला.
तेजप्रकाश वेदप्रकाश लोकरे (वय 11 वर्षे, रा. डिकसळ) हा मुलगा पालकांनी रागवल्यामुळे रागाच्या भरात घर सोडून गेला होता. पालकांनी वेळेतच पोलीस ठाण्याकडे धाव घेतल्यामुळे कळंब पोलिसांनी तपासाची सुत्रे तीव्र गतीने फिरवून चोवीस तासांच्या आत तेजप्रकाश लोकरे या मुलाचा कुर्डवाडी येथे शोध घेऊन त्याला पालकाकडे सुखरुप सुपुर्द केला. यामुळे नागरिकांचा पोलीसावरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत सावळे यांचा सत्कार राष्ट्रवादीचे प्रदिप मेटे यांच्या हस्ते तर पोलीस उपनिरीक्षक शेळके यांचा सत्कार प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष शिवाजी कराळे यांच्या हस्ते व पोलीस नाईक रमेश कदम यांचा सत्कार नंदकुमार कापसे यांनी शाल, फेटा व श्रीफळ देऊन केला.
हा सत्कार समारंभ पार पाडण्यासाठी प्रमिष्ठाणचे सुहास इंगळे, अमोल बारटक्के, सुजित भोसले, बप्पा चेंदे, प्रितम पंडित आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ जाहीर यांनी केले तर शिवाजी कराळे यांनी आभार मानले.