उस्मानाबाद :- औरंगाबाद विभागस्तरीय व जिल्हास्तरी प्रदर्शन व विक्री सिध्दी-2013  उस्मानाबाद येथे समुह व बचतगट निर्मित वस्तुंचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री जिल्हा क्रीडा संकुल, येथे 25 नोव्हेंबर पासून सुरु असून या  प्रदर्शनास जनतेकडून भर-भरुन उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनातील विक्रेत्यांशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास यांनी आज गुरुवार रोजी विक्रेत्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेवून त्यावर तात्काळ उपाय योजना करण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.
    जिल्हा क्रीडा संकुलातील या प्रदर्शनामध्ये विदर्भ, खानदेश, पश्चिम, महाराष्ट्र व मराठवाड्यातून साधारण अडीचशे महिला  बचत गटांनी सहभाग नोंदवला आहे. या बचतगटांनी हस्तकला, पाककला, प्रसाधने, पोषण आहार विविध मुर्ती, खेळणी, विविध प्रकारचे, घोंगडी तसेच विदर्भातील वनाऔषधी, मुसळी, आवळा पदार्थ, लहान मुलांची आकर्षक लाकडी खेळणी, बंजारा ड्रेस, ज्युसच्या पिशव्या, मसाला पापडर, मुगाची भजी, मासवडी, शिरकुर्मा, अंबील, खानदेशी वांगी भरीत, कळण्‍याची भाकरी तसेच खानदेश व विदर्भातील विविध खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असून अनेक दर्दी खवय्ये त्याचा स्वाद-चव घेत असल्याचे दिसत आहेत.
    गेल्या चार दिवसापासून सांस्कृतिक मेजवाणी साठी संध्याकाळी प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागारीकांना विरंगुळा म्हणून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबत प्रबोधनही करण्यात येत आहे व प्रदर्शनात सहभागी झालेल्या गटातील महिलांच्या विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आला आहे.  दि. 29 रोजी संगीत रजनी (स्वरानंद), आणि 30 नोव्हेंबर  रोजी भारुडाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच प्रदर्शनस्थळी मोफत जेवण व चहा नाष्टा, मोफत निवास, पिण्यासाठी शुध्द पाणीपुरवठा, मोफत वैद्यकिय सुविधा, अग्नीशमन व्यवस्था, मोफत स्टॉल आणि विद्युत सेवा पुरविण्यात आल्या आहेत.
           सरासरी या सर्व स्टॉलवरील विक्री आजपर्यंत 7 लाख 27 हजार 710 रुपये झाली असून हे प्रदर्शन संपेपर्यंत जवळपास 35 ते 40 लाखापर्यंत उत्पादीत मालाची विक्री होईल, अशी अपेक्षा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. या प्रदर्शनास जनतेकडून भर-भरुन प्रतीसाद मिळत असल्याचेही विक्रेत्यांनी सांगितले.
    तसेच या विक्रीमध्ये रोजच्या रोज वाढ होत असल्याचे त्यांनी सांगीतले. सदर प्रदर्शनातील विक्रेत्यांशी प्रत्यक्ष चर्चेतून त्यांना देण्यात आलेल्या सुविधा राहणे, जेवण, पाणी आदि व्यवस्थित मिळत असल्याचे व समाधानी असल्याचे त्यांनी सांगितले.
    या प्रदर्शनामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून 22, जालना-13, नांदेड-34, बीड-15, हिंगोली-12, परभणी-15, लातूर-29,  बुलढाणा-1, जळगाव-2, रायगड-1, उस्मानाबाद-55 अशा अनेक ठिकाणाहून महिला बचत गट उत्पादीत वस्तू विक्रीसाठी घेवून आल्या आहेत. या बचत गटाकडील वस्तु उत्तम प्रकारच्या असल्यामुळे खरेदीसाठी नागरीक, महिला, बच्चे कंपनी गर्दी करीत आहेत.
    वैशिष्टपुर्ण असणा-या बचत गट पुढीलप्रमाणे आहे. भिमाई महिला बचत गट बुलढाणा यांनी शेतीत उत्पादित केलेल्या  आयुर्वेदीक वनस्पती सफेद मुसळी पावडरची विक्रमी विक्री केली आहे. या गटातील महिलांचे विक्री कौशल्य अतिशय चांगले आहे. या गटाने  पंजाब, दिल्ली आणि मुंबई येथील प्रदर्शनात सहभागी झाले होत.  या गटाने आजपावेतो 30 हजारापयंत विक्री केली आहे. समता महिला बचत गट- पाचोड, जि. जळगाव यांनी मसाला व पापडची  25 हजारापर्यंत विक्री केली आहे. अहिल्यादेवी महिला बचत गटा-ताडनायंगाव, जि.जालना यांनी घोंगडीची 40 हजाराची विक्रमी विक्री  केली आहे. श्रीसाई महिला बचत गट सोयगाव, जि. औरंगाबाद यांनी स्टोन आर्टिकल मुर्ती आदिची विक्री 25 हजारापर्यत केली आहे. ओम महिलाबचत गट माथेरान यांच्याकडील  लेदर चप्पल व इतर पादत्राणे विक्री केली आहे. गंगासागर महिला बचत गट जळगाव यांचे खानदेशी वांग्याचे भरीत व भाकरी  उस्मानाबादकर चवीने चाखत आहेत. हरिओम महिला बचत गट निफाड, जि. नाशिक यांचे काळे मणुके ,किसमिस विक्रमी विक्री केली आहे.
    विशेष करुन नागरीक आयुर्वेदीक वनऔषधी, मुसळी, शतावरी, निरगुडी तेल, आवळा कँडी, आवळाकंद,  शिकाकाई पावडर, हळद पावडर याशिवाय अनेक वेगवेगळी वनऔषधी या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे. विशेष करुन ज्यांना पाठीचा मणक्याचा त्रास आहे असे नागरीक शयन करण्याकरीता घोंगडी खरेदी करताना दिसत आहेत. सर्वज्ञ कयाधु हर्बल प्रोडक्ट यांचे हायड्रोऑल पर्पज पॅक, हळदी चंदन, वांग क्रीम, कुमारी अर्क, अशी वेगवेगळी प्रोडक्ट महिला खरेदी करताना दिसत आहेत. विशेष करुन बच्च कंपनी दहि धपाट्यावर ताव मारताना दिसत आहत.
    या प्रदर्शनास विविध प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी आदिंनी भेटी देवून समाधान व्यक्त केले.  या प्रदर्शनास जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी भेट देवून लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकांनी केले आहे. हे प्रदर्शन दि. 1 डिसेंबर,2013 पर्यंत जनतेसाठी खुले राहणार आहे.
 
Top