उस्मानाबाद :- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने उस्मानाबाद येथे   दि. 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत स्वयंसहायता महिला बचतगट उत्पादित मालाचे व वस्तूंचे जिल्हास्तरीय तेजस्वीनी बाजार महोत्सव-2013 चे आयोजन करण्यात आले आहे. बसस्थानकाजवळ नगरपरिषदेच्या समोरील यशराज लान्स येथे हे प्रदर्शन भरणार असून 50 हून अधिक बचत गट सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 30 रोजी दुपारी 12 वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डा. वैशाली कडूकर-पाटील या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
      या तेजस्विनी बाजार महोत्सवात महिला बचत गट उत्पादित गृहोपयोगी आकर्षक व सुंदर शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, रेडीमेड कपडे, गावरान धान्य-दाळी, पापड, शेवया, मसाले, चटणी, खाद्य पदार्थ आदींचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. याशिवाय तीनही दिवस सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होणार आहेत.
      या तेजस्वीनी बाजार महोत्सवाचा लाभ जिल्ह्यातील व परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संतोष इंगोले यांनी केले आहे.
 
Top