उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: शहरातील पंचायत समितीच्‍या मैदानावर महर्षी वाल्मिकी जयंती समारोह सोहळा रविवार दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्‍यात आला आहे.
    महाराष्‍ट्र राज्‍यातील कोळी बांधवांचे आराध्‍य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती कार्यक्रमात कोळी समाज संघटनेचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष तथा ठाणे महानगरपालिकेचे महापौर अनंत तरे हे मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्‍हणून माजी आमदार रविंद्र गायकवाड, आ. ज्ञानराज चौगुले, बार्शी येथील आरएसएम उद्योग समूहाचे संस्‍थापक अध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे, शिवसेनेचे जिल्‍हा उपप्रमुख सुधीर पाटील, भाजपाचे विभाग संघटन मंत्री अविनाश कोळी, महाराष्‍ट्र कोळी संघटनेचे राज्‍य उपाध्‍यक्ष सिध्‍देश्‍वर कोळी, अक्‍कलकोटच्‍या उपनगराध्‍यक्षा सौ. छाया कामाटी, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे सादीक कारचे, जि.प. सदस्‍य कैलास शिंदे, दिलीप भालेराव, हरीष डावरे, भारीप नेते रामभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    या कार्यक्रमानंतर सायंकाळी सहा वाजता कोळी गितांचा व लोकगिताच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जयंती सोहळा यशस्‍वी करण्‍यासाठी कोळी बांधवांनी मोठ्या संख्‍येनी उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ कोणे, ज्ञानेश्‍वर पालमपल्‍ले, संजय सर्जे, प्रभाकर घाटे, दिगंबर जमादार, सौ. इंदूबाई घाटे, जिवन जगदाळे, सत्‍यवान भालेराव, विक्रम घाटे, ब्‍यंकट घाटे, हणमंत पालमपल्‍ले, बापू जगदे, किशोर घाटे, अंबादास गुंढे यांच्‍यासह समाज बांधवांनी केले आहे.
 
Top