बार्शी :- येथील माजी नगरसेवक दशरथ उर्फ दादा माने (वय ५५) यांचे आज शनिवार दि. 9 नोव्‍हेंबर रोजी दुपारी हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, तीन विवाहित मुली, सून, नातवंडे, जावई व चार भाऊ असा परिवार आहे.
    दादा माने यांना आज शनिवार रोजी राहत्या घरी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे वैद्यकिय अधिकार्‍याने सांगितले. दादा माने हे तीन वेळा बार्शी नगपरिषदेचे सदस्य होते. माजी नगराध्यक्ष विश्‍वास बारबोले यांचे ते निकटवर्ती व विश्‍वासू मित्र होते. टपरी आंदोलनात त्यांना नगरसेवकपदही गमवावे लागले होते. राजकारण व समाजकारणात दादा माने यांनी चांगले योगदान दिले होते. दादा माने यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अलीपूर रोडवरील निवासस्थानी मित्रमंडळी, नातलगांनी गर्दी केली. माने कुटूंबियावर दादा माने यांच्या आस्कमिक निधनाने शोककळा परसली होती. बार्शी येथील मंगळवार पेठेतील मोक्षधाम मध्ये दादा माने यांच्या पार्थिवावार रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बार्शीच्या विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
 
Top