कळंब : शहरातील विद्याभवन हायस्कूल ढोकी रोड कळंब येथे पतंजली योग समितीच्या वतीने योग प्राणायाम शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दिनांक १० ते १४ नोव्हेंबर २०१३ हे पाच दिवस दररोज सकाळी ५ ते ७ यावेळेत संपन्न होणार आहे.
     त्यामध्ये व्यंकटराव मुंडे, शशिकुमार भातलवंडे, ज्ञानेश्वर आर्य, सुधाताई आळीमोरे, बापू पाडाळकर हे योग विज्ञान क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत तरी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन पतंजली योग समितेचे तालुका प्रभारी शशिकुमार  भातलवंडे, किसान पंचायतचे महाराष्ट्र राज्य प्रभारी नितीन तावडे, तालुका सचिव अ‍ॅड.सुरेश कुलकर्णी, आत्माराम गुंजाळ, अर्चना भातलवंडे, शेख सुलतान महेबूब, डॉ. राजेंद्र बावळे यांनी केले आहे.
 
Top