उस्मानाबाद :  शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ चिखली येथील गावक-यांनी घ्यावा. या योजनांचा लाभ घेण्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  मधुकरराव चव्हाण यांनी चिखली (ता. उस्मानाबाद) येथे केले. 
     चिखली येथे ना. चव्हाण यांच्या हस्ते स्थानिक निधीतून बांधण्यात येणा-या सांस्कृतिक सभागृहाचे भुमिपुजन त्यांच्या हस्ते झाले  त्यावेळी ते बोलत होते.  
    या प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, उस्मानाबाद जनता बॅंकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, जि. प. सदस्य सुधाकर गुंड, विश्वास शिंदे, पं.स.सदस्य श्रीमती काझीद, फुलचंद वाघमारे,  डॉ.राजलक्ष्मी गायकवाड, राजेंद्र शेरखाने, सरपंच देवीदास जाधव, धनंजय रणदिवे आदींची उपस्थिती होती.
    राज्य शासनाने ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना मदतीचे वाटप केले. निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळयोजनेतून मदत देण्यात आली. तसेच जिल्ह्यात गरजू लाभार्थ्यांना घरकुले, अन्न सुरक्षा कायद्याच्या दखल शासनाने घेतली आहे. जिल्ह्यात गंभीर आजारी रुग्णांवर आता राजीव गांधी आरोग्य योजनेमुळे उपचार करणे शक्य होणार आहे. तसेच गावक-यांनी गावाचा विकास आराखडा तयार करुन विकास कामे करुन घ्यावीत, असे  पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष हंगमिरे तर  देविदास जाधव यांनी प्रास्ताविक करुन सर्वांचे आभार मानले.
    यावेळी दर्शन कोळगे, दत्तात्रय सोनटक्के, सिध्दार्थ बनसोडे, शमियोद्यीन मशायक, खलील सय्यद, महेबुब पटेल यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   
 
Top