कळंब : येथे येत्या प्रजासत्ताक दिनापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा येरमाळा रोडवरील पं.जवाहरलाल नेहरु बालोद्यानामध्ये बसवण्यात येणार आहे. या बाबतच्या पहिले मॉडेल मंजुरीनुसार सदरील पुतळा तयार करण्याचे काम मडलिगेकर आर्ट स्टुडिओ औरंगाबाद यांना देण्यात आलेले आहे. या पुतळ्यासाठी यापुर्वी दहा लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला होता. त्यानंतर पाच लाख रुपयाचा धनादेश नुकताच नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.
येत्या नवीन वर्षात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या अगोदर आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठ्या समारंभामध्ये या पुर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार आहे. तसेच कळंब नगर परिषद ही उस्मानाबाद जिल्ह्यातील क वर्ग नगर परिषद आहे व शहरात अ वर्गाची बाजारपेठ आहे, कळंब शहर आणि शेजारील डिकसळ या गावास मांजरा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. धरणात सध्या १४.३१ द.ल.घ. मि. इतका मृत पाणीसाठा शिल्लक आहे, ते पाणी फक्त डिसेंबर २०१३ अखेर पर्यंत पुरेल एवढेच आहे भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता पर्यायी उपाययोजना करणेसाठी तालुक्यातील चोराखळी धरणातून कळंब शहरासाठी ०. ७५ द.ल.घ. मि. इतका पाणीसाठा आरक्षित करावा लागणार आहे, चोराखळी धरण ते डिकसळ जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत टैंकरणे पाणी पुरवठा करणेसाठी जानेवारी २०१४ ते ३० जुलै २०१४ पर्यंत ७१८.०० लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे. मागील वर्षी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास योजना अमरावती यांनी पाण्याच्या पर्यायी स्त्रोताचे सर्वेक्षण करून अहवाल नगर परिषदेकडे दिला त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण बांधकाम विभाग उस्मानाबाद यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. मात्र तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेस मान्यता प्रदान करणे आवश्यक असल्याचे मत नगराध्यक्ष कापसे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१३ या कालावधीत चार कोटी १० लाख ७६ हजार आठशे रुपये ची विकास कामे केली असून साडेचार कोटीचे कामे प्रस्तावित मंजूर स्तरावरील असल्याचे सांगितले. तसेच कळंब शहरातील भाजी मंडई रोडवरील सर्वे नं. १०८ मध्ये गाळे बांधले जाणार आहेत, कै. विलासरावजी देशमुख यांच्या नावाने भव्य अशा नाट्यगृहाचे बांधकाम केले जाणार असून सर्व विकास कामाच्या बांधकामासाठी शहरातून वायफळ जाणारे सांडपाणी वापरात आणले जाणार असल्याचे सांगितले.
या पत्रकार परिषदेस गटनेते मुश्ताक कुरेशी, नगरसेवक सुनील गायकवाड, बांधकाम सभापती अतुल कवडे, अभियंता जे.सी.बावळे, प्रताप मोरे, माजी नगराध्यक्ष भागवत चोंदे आदी उपस्थित होते.

(बालाजी जाधव)