कळंब - मस्सा (ख.) ता. कळंब येथे 17 एप्रिल पासून केरोसीन पुरवठा कमी होत असून याबाबत ग्रामस्थांनी दुकानदारास विचारणा केली असता शासनाकडून आम्हाला कमी प्रमाणात केरोसीन देत असल्याचे संबंधित दुकानदाराने सांगितले असून दि. 1 ऑगस्ट 2013 रोजी नऊशे लिटर केरोसीन मिळाले होते व दि. 31 ऑक्टोबर रोजी आठशे लिटर केरोसीन मिळाले असल्याचे सबंधित दुकानदाराने सांगितल्यावरुन याची शहनिशा करण्यासाठी काही शिधापत्रिका धारकांनी थेट तहसिल कार्यालय गाठून नायब तहसिलदार शिंदे यांना भेटून निवेदन दिले.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, मौजे मस्सा (ख.) येथील दुकान क्रमांक दोनमध्ये 243 कार्डधारक असून कार्डधारकांना युनिटप्रमाणे केरोसीन किती मिळते, तसेच गॅस धारकांना केरोसीन किती मिळते? याबाबत माहिती याद्याद्वारे लेखी स्वरुपात द्यावी तसेच दुकान क्रमांक दोनचे परवानाधारक यांची सखोल चौकशी व्हावी, रेशनकार्ड धारकांना न्याय द्यावा, अन्यथा दि. 20 नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा कार्डधारकांनी दिला आहे. या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते बब्रुवान गोरे, रसुल तांबोळी, सुरेश शिंदे, मधुकर गालफाडे, बाळासाहेब तेली, महावीर जाधव, सुदाम घाडगे, नारायण माळी, नंदकुमार शिंदे, जयहिंद फरताडे यांच्यासह 195 ग्रामस्थांच्या सह्या आहेत