कळंब (बालाजी जाधव) -: मिटकॉन पुणे यांच्‍या तर्फे एमकेसीएल च्‍या एमएस-सीआयटी या अभ्‍यासक्रमाचा उत्‍कृष्‍ट प्रशिक्षण केंद्र हा पुरस्‍कार कळंब येथील अॅप्‍टेक कॉम्‍प्‍युटर एज्‍युकेशनला मिळाला आहे. हा पुरस्‍कार अॅप्‍टेक च्‍यावतीने प्रा. संजय घुले यांनी स्विकारला. एमएस-सीआयटी अभ्‍यासक्रमाच्‍या उत्‍कृष्‍ट प्रशिक्षणाबद्दल व व्‍यवसायातील सातत्‍याबद्दल हा पुरस्‍कार दरवर्षी प्रत्‍येक जिल्‍ह्यातील एका केंद्राला देण्‍यात येतो.
    या कार्यक्रमासाठी एमकेसीएल चे जिल्‍हा समन्‍वयक धनंजय जेवळीकर, मिटकॉनचे विभागीय समन्‍वयक मच्छिंद्र बहिरे, रोटरी क्‍लब ऑफ कळंब सिटीचे अध्‍यक्ष अँड. दत्‍ता पवार, शिशीर राजमाने, विश्‍वजीत ठोंबरे, धर्मेंद्र शहा, सुंदर कदम यांच्‍यासह विद्यार्थी उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना मच्छिंद्र बहिरे म्‍हणाले की, गेल्‍या तीन वर्षापासून या विभागातील उत्‍कृष्‍ट प्रशिक्षण केंद्र म्‍हणून अॅप्‍टेकला गौरविले जात आहे. आज हा पुरस्‍कार प्रदान करताना मला अतिशय आनंद होत आहे. कळंब चे अॅप्‍टेक खरोखरच स्‍तुतीपात्र आहे.
    धनंजय जेवळीकर यांनी अॅप्‍टेकच्‍या कार्याबद्दल कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या. अध्‍यक्षीय समोराप अँड. दत्‍त पवार यांनी केले. प्रा. संजय घुले यांनी     पुरस्‍काराचे श्रेय संस्‍थेतील सर्व प्रशिक्षकांना दिले. या कार्यक्रमाचे सुत्रसचांलन प्रा. विजय घोळवे यांनी केले तर दिग्विजय माळवदे यांनी आभार मानले.
फोटो :
 
Top