एस.के. गायकवाड
नळदुर्ग -: येथील नगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेचा दीड कोटी रुपयांचा निधी परत पाठविल्‍याच्‍या निषेधार्थ व विविध मागण्‍यांसाठी रिपाइंच्‍यावतीने मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग नगरपालिकेवर मोर्चा काढून निदर्शन आंदोलन करण्‍यात येणार आहे. 
   नळदुर्ग नगरपालिकेने रमाई आवास घरकुल योजनेचा दीड कोटी रुपयांचा निधी परत पाठवून मागासवर्गीय लोकांवर अन्‍याय केला आहे. न.पा. च्‍या या कृत्‍याचा रिपाइंच्‍यावतीने जाहीर निषेध करण्‍यात येत असून याच्‍या निषेधार्थ तसेच बौध्‍दनगर येथील सर्व्‍हे नं. 29 मधील शासकीय गावठाण जमिनीवर अतिक्रमण करुन कच्‍च्‍या घरात राहणा-या मागासवर्गीय लाभार्थ्‍यांना त्‍यांचे अतिक्रमण कायम करुन त्‍यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा या प्रमुख मागण्‍यांसह इतर विविध मागण्‍यासंदर्भात तुळजापूर तालुका रिपाइंच्‍यावतीने दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग नगरपालिका कार्यालयावर मोर्चा तसेच निदर्शने आंदोलन करण्‍यात येणार आहे. या मोर्चा व आंदोलनात रिपाइं कार्यकर्त्‍यांनी मोठ्या संख्‍येनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे. 
     सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्‍या निवेदनावर रिपाइंचे जिल्‍हा उपाध्‍यक्ष दुर्वास बनसोडे, तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड, नळदुर्ग शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे, सदस्‍य बाणू बनसोडे आदींच्‍या सह्या आहेत.
 
Top