उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिला सुरक्षित होत्या. महिलेवर अत्याचार करणार्या रांझाच्या पाटलाचे हात-पाय तोडून महाराजांनी महिलांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली होती. महाराजांच्या याच राज्यात आज महिलांवर दिवसाढवळ्या अत्याचार होऊ लागले आहेत. त्यामुळे अत्याचार करणार्यांचे हात-पाय कलम करा किंवा त्यांचा प्रतापगडावरून कडेलोट करा, असे आवाहन व्याख्याते प्रा.अमोल मिटकरी (अकोला) यांनी केले.
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी शहरातील जिजाऊ चौकात शिवप्रताप दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी जपानचे उद्योजक बाळासाहेब देशमुख, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव शिंदे, अँड. मिलिंद पाटील, उपनगराध्यक्ष अमित शिंदे, र्शीकिशन भन्साळी, प्रशांत कुदाळ, अनिल खोचरे, युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष जाधव, दत्ता कुलकर्णी, नितीन भोसले, र्शीकांत डांगे, करणराजे बांदल, अजयदादा जाधवराव, नाना धुमाळ शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे आदी उपस्थित होते.
प्रतापगडावरील शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीचा प्रसंग अत्यंत करारी आवाजात मांडून प्रा. मिटकरी यांनी शिवप्रेमींसमोर इतिहास उभा केला. प्रा. मिटकरी म्हणाले, नांदेडच्या गुरुद्वारासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून शिख धर्मियांनी गुरू गोविंदसिंगांवरचे प्रेम दाखवून दिले आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांचे रक्त सांडलेल्या स्थळाचीही दुरवस्था झाली आहे.राज्यात शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणार्यांनी शिख बांधवांचा आदर्श घेतला पाहिजे. शिवाजी महाराजांची कल्पकता, युक्तीचा युवकांनी अभ्यास केला पाहिजे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रज अधिकार्यांना चकवा देऊन नजरकैदेतून आपली सुटका करून घेतली होती. त्यांना पत्रकारांनी याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचून ही प्रेरणा मिळाल्याचे सांगितले होते. सुभाषचंद्र बोस यांनी जीवनात शिवरायांनाच आदर्श मानले होते. क्रिकेटर युवराजसिंग यालाही महाराजांच्या चरित्रामुळेच दुर्दम्य आजारातून सुटका मिळाली आणि तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उभा राहिला. युवकांनी शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करताना त्याचा वर्तमान जीवनात उपयोग करून घेतला पाहिजे.

कार्यक्रमात समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या 2014 मधील दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विश्वासराव शिंदे, जपानचे उद्योजक बाळासाहेब देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. हनुमंत पवार यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी शहरासह ग्रामीण भागातील हजारो शिवप्रेमींची उपस्थिती होती. सकाळच्या भव्य मिरवणुकीने शहरात चैतन्य निर्माण झाले होते. त्यानंतर सायंकाळी व्याख्यानाने वातावरण शिवमय होऊन गेले. थंडीच्या कडाक्यातही शिवप्रेमींचा उत्साह दिसून येत होता. दरम्यान, फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विष्णू इंगळे, ओंकार नायगावकर, अभिजित निंबाळकर, प्रा.नंदकुमार नन्नवरे, बंडोपंत जोशी आदींनी पुढाकार घेतला.