लातूर : जो नही करेगा नरेगा वह मरेगा, असा इशारा देत राज्याचे रोहयो व जलसंधारणमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबाबत (नरेगा) अधिका-यांनी फक्त तक्रारी करण्यापेक्षा काम करावीत, असे आवाहन केले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय लातूर व उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी येथील दिवाणजी मंगल कार्यालयात आयोजित सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांच्या मेळाव्यात डॉ. नितीन राऊत बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री मधुकरराव चव्हाण होते. प्रमुख पाहूणे म्हणून रोहयो राज्यमंत्री सुरेश धस, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विक्रम काळे यांची उपस्थिती होती.
नरेगाच्या कामांसाठी नरेगाच्या नियमांचे पालण करावेच लागेल, असे नमुद करुन डॉ. नितीन राऊत पुढे म्हणाले की, शेतीच्या चांगल्या विकासासाठी वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्राधान्य द्यावे. जूनी कामे पूर्ण करुनच नवीन कामे हाती घ्यावी. अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती, दारिद्रय रेषेखालील, भूसूधार योजनेतील इंदीरा आवास योजनेचे लाभार्थी व वन अधिकारी अधिनियमानूसार प्राप्त वन निवासी याकरीता सिंचन विहीरी, शेततळी, फळबाग लागवड, भूसुधारणा इत्यादी वैयक्तिक लाभाची कामे या करता येतील. ही कामे करीत असताना अकुशल-कुशल प्रमाण ग्रामपंचायत स्तरावर ६०:४० राखणे आवश्यक आहे. नरेगाच्या कामांत अधिका-यांची उदासीनता काहीं बाबतीत दिसून येते त्यांच्या वर काय कारवाई करायची ते आम्ही बघू, असेही त्यांनी सांगीतले.
अध्यक्षीय समारोप करताना पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले की, ग्रामीण विकास नरेगातूनच शक्य आहे. त्यामुळे या योजनेची कामे करण्याची मानसीकता निर्माण झाली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी बोलताना रोहयो राज्यमंत्री सुरेश धस म्हणाले की, नांदेडमध्ये ही योजना बंद पाडण्याचा उद्योग झाला. परंतू काम करताना चुका होतातच. त्या चुका आम्ही सांभाळून घेऊ. चुका होऊ द्या, कामे करा. सरपंच, ग्रामसेवकांनी अपडेट राहीले तर या योजनेचे कल्याण होईल, असे ते म्हणाले. यावेळी आमदार सुधाकर भालेराव, आमदार विक्रम काळे, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष व्हट्टे, रोहयोचे आयुक्त व्ही. गिरीराज, रेणापूर पंचायत समितीच्या सभापती अनिता पवार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे यांनी केले. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी केंद्रे यांनी नरेगाची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सभापती सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, सभापती बालाजी कांबळे यांच्यासह लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. मेळाव्यास दोन्ही जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मेळाव्यात रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांच्यामुळेच महराष्ट्रातील रोजगार हमी योजना केंद्र शासनाने स्विकारली आणि या योजनेतून लाखो लोकांच्या हाताला काम तर मिळालेच शिवाय या योजनेने ग्रामीण भाग समृद्धही झाला, असे सांगीतले. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण व रोहयो राज्यमंत्री सुरेश धस यांनीही लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याला यावेळी उजाळा दिला.