नळदुर्ग :- अणदूर (ता. तुळजापूर) येथे दि. 11 नोव्हेंबर ते दि. 17 नोव्हेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण कालावधीत पहाटे 4 ते 6 काकडा आरती होणार असून सकाळी 6 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण, 11 ते 1 भोजन, 1 ते 2 गाथ्यावरील भजन, 4 ते 5 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 7 ते 9 भोजन, 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी रामकृष्ण तोरंबेकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.