नळदुर्ग : येथील मराठा गल्ली येथे दि. 5 नोव्हेंबरपासून सुरु असलेल्या संत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची माउलींच्या पालखी मिरवणुकीने सोमवार रोजी सांगता झाली. यावेळी काल्याचे किर्तन काक्रंबा (ता. तुळजापूर) येथील ह.भ.प. ढेरे महाराज यांचे झाले. काल्याच्या किर्तनानंतर शहरातून माऊलीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
नळदुर्ग येथील मराठी गल्ली येथे दि. 5 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. पारायण कालावधीत दररोज सकाळी-संध्याकाळी भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड व दीपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. पारायण कालावधीत सकाळी अल्पोपहार कुरुक्षेत्र किल्लेदार, विजय किल्लेदार, शिवाजी चौधरी, राजेंद्र जगताप, दयानंद जाधव, दशरथ जाधव यांनी दिला तर वारक-यांना भोजन बाबुराव सुरवसे, रामकृष्ण महाबोले, राजेंद्र महाबोले, संजय दळवी, विजयकुमार धरणे, सुभाष महाबोले, शिवाजी पवार, गुंडू जगता, शिवाजी बेले, नामदेव मुळे, गिरमलप्पा बताले यांनी दिले. दि. 11 नोव्हेंबर रोजी निवृत्ती काळे यांनी भोजन दिले तर महाप्रसाद महाराणा प्रताप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सचिव मनीष हजारे यांनी दिला.
सोमवारी सकाळी ह.भ.प. गुरुवर्य एकनाथ महाराज वासकर यांच्या हस्ते पसायदान झाले. त्यानंतर तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील ढेरे महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या किर्तनानंतर माऊलीची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मराठा गल्ली येथून निघालेली मिरवणूक मिरवणूक पॉंचपीर चौक, भोई गल्ली, चावडी चौक, भवानी चौक, राममंदीर, धर्मवीर संभाजी चौक मार्गे मराठा गल्ली येथे आल्यानंतर मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले. यानंतर गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेल्या श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता झाली.