बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : विद्यापीठ अनुदान आयोगाने पुरस्कृत केलेल्या ‘इर्मजिंग होरायझन्स इन बायोकेमिकल सायन्सेस अँन्ड नॅनामटेरियल्स’ या विषयावर आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषद बार्शीत होत असल्याची माहिती प्रा.मधुकर फरताडे यांनी दिली.
    येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्‍या शिवाजी महाविद्यालयात दि. 28 ते 30 नोव्‍हेंबर रोजी पश्चिम महाराष्‍ट्रात महाविद्यालयीन पातळीवर बार्शीत ही परिषद प्रथमच होत आहे. या परिषदेत संपूर्ण देशभरातून 265 तरुण संशोधक शोधनिबंध सादर करणार आहेत.
    संत तुकाराम सभागृह येथे शास्‍त्रज्ञ तथा राजस्‍थान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एन. मालदार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे उदघाटन होणार आहे. यावेळी देशभरातील संशोधक यात सहभागी होणार आहेत. परिषदेच्‍या समारोप प्रसंगी राज्‍याचे उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांची उपस्थिती राहणार असून जिल्‍ह्याचे पालकमंत्री दिलीप सोपल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होत असल्‍याचे प्राचार्य डॉ. मधुकर फरताडे यांनी सांगितले.
    परिषद यशस्‍वी करण्‍यासाठी डॉ.एस.एस. गायकवाड, डॉ. व्‍ही.एम. गुरमे, डॉ. पी.आर. थोरात, डॉ. टी.एन. लोखंडे, डॉ. देवकर, डॉ. कोठावळे आदीजण परीश्रम घेत आहेत.
 
Top