मुंबई : एका वर्षाचे ३६५ दिवस. मात्र सरकारी कर्मचार्यांवर २0१४ च्या नवीन वर्षात सुट्टय़ांचा पाऊस पडणार आहे. तब्बल ९७ सुट्टय़ा कर्मचार्यांना मिळणार आहेत. नव्या वर्षात ५२ रविवार, दुसरा व चौथ्या शनिवारच्या २४ आणि सणासुदीच्या २१ अशा एकूण तब्बल ९७ सुट्टय़ा मिळणार आहेत. २0१३ या वर्षात शासकीय कर्मचार्यांना ९१ सुट्टय़ांचा आनंद लुटायला मिळाला. या वर्षात ७ सुट्टय़ा बुडाल्या तर २0१४ मध्ये केवळ ३ सुट्टय़ा बुडणार आहेत.
डिसेंबर महिना जसजसा जवळ येतो. तसतसे नव्या वर्षाच्या दिनदर्शिकेची चाहूल लागते. डिसेंबर महिन्यात नवीन वर्षाच्या दिनदर्शिका बाजारात येतात. मात्र आता नोव्हेंबर महिन्यात २0१४ च्या दिनदर्शिका बाजारात दाखल झाल्या आहेत. २0११ मध्ये शासकीय कर्मचार्यांना ८६ सुट्टय़ा, २0१२ मध्ये ९६, २0१३ मध्ये ९१ सुट्टय़ा मिळाल्या. २0१३ च्या ऑगस्ट महिन्यात दि. ९ रोजी रमजान ईद आली होती. २0१४ मध्ये २९ जुलै रोजी रमजान ईद आहे.
२0१३ मध्ये गणेश चतुर्थी ९ सप्टेंबर तर अनंत चतुर्थी १८ सप्टेंबरला आली होती. नव्या वर्षात २९ ऑगस्ट गणेश चतुर्थी तर ८ सप्टेंबरला अनंतचतुर्थी आहे. २0११ मध्ये दिवाळी ऑक्टोबर महिन्यात तर २0१२ व २0१३ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आली होती. नव्या वर्षात २२ ऑक्टोंबरपासून दिवाळी सुरू होणार आहे. २३ रोजी लक्ष्मी पुजन आणि २४ रोजी पाडवा, २५ ला चौथा शनिवार, २६ रोजी रविवार अशा सलग चार दिवस सुट्टय़ा मिळणार आहेत. नववर्षात मार्च, एप्रिल, ऑगस्ट व ऑक्टोबर सरकारी कर्मचार्यांना मिळणार आहे. १६ रोजी रविवार आणि १७ रोजी धूलिवंदनाची सुटी तर ३0 ला रविवार आणि ३१ रोजी गुढीपाडव्याची सुटी निघणार आहे. एप्रिल महिन्यात १२ ला दुसरा शनिवार, १३ ला रविवार, १४ रोजी भारतर▪डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात शुक्रवारी १५ ऑगस्ट, जानेवारी महिन्यात प्रजासत्ताकदिन शनिवारी, रविवारची सुट्टी आणि सोमवारी पारसी दिनाची सुट्टी मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्यात २ रोजी गांधी जयंती, ३ रोजी दसरा, ५ रोजी बकरी ईद सलग सुट्टय़ा मिळणार आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचार्यावर सुट्टय़ांचा जणू पाऊसच पडणार आहे.