पांगरी -: लग्नाचे आमिष दाखवुन व प्रेमाचे नाटक करून एका एकोणीस वर्षीय शालेय विद्यार्थीनीवर अक्कलकोट, तुळजापुर, मैदर्गी अशा वेगवेगळया ठिकाणी वारंवार बलात्कार केल्याची घटना चिखर्डे (ता. बार्शी) येथे उघडकीस आली असुन बलात्कार केल्याप्रकरणी व फुस लावुन शरीरसंबंध ठेवण्‍यास भाग पाडल्यामुळे मुलासह त्याच्या आई, वडील, भाऊ, बहीण अशा पाचजणासंविरूदध पिडीत विद्यार्थीनीच्या फिर्यादिवरून पांगरी पोलिसात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.
    दत्‍तात्रय भागवत कोंढारे असे बलात्कार केल्याप्रकरणी तर लग्नाचे आमिष दाखवुन आरोपीसोबत शरीर संबंध ठेवण्‍यास भाग पाडल्याप्रकरणी रागिनी भागवत कोंढारे, सोमनाथ भागवत कोंढारे, सिताबाई भागवत कोंढारे व भागवत कोंढारे या नातेवाईकांविरूदध गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे.
     अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, आरोपीच्या बहिनीबरोबर तिचे मैत्रीपुर्ण संबंध असल्यामुळे तिचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. पिडीत मुलगी एकदा आरोपीच्या घरी गेल्यानंतर घरी कोणीच नव्हते तेव्हा संधी साधुन आरोपीने प्रेम असल्याचे व लग्न करण्‍यास तयार असल्याचे सांगितल्यानंतर तेथुन पुढील प्रकारांना सुरूवात झाली. आरोपीने सदर मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने परगावी राहण्‍यास गेली असता त्याने तेथेही जावुन मुक्कामी रहावुन शरीरसंबंध ठेवले. आरोपीने तुळजापुर, अक्कलकोट येथील लॉजवर नेऊन व मैदर्गी येथील मुलीच्या खोलीवर मुक्कामी राहून पिडीत मुलीबरोबर शरीरसंबंध ठेवले. लग्नाचे आमिष दाखवुन शरीरसंबंध ठेऊन लग्नास नकार देण्‍यात आल्यामुळे व आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यामुळे पिडितेने पांगरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे. अत्याचार पीडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरुन बलात्कार केल्याप्रकरणी व त्यास मदत केल्याप्रकरणी पाचजणांविरूदध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असुन अधिक तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत.

 
Top