पांगरी : स्टोचा भडका होऊन भाजुन गंभीर जखमी झालेल्या नवविवाहितेचा जिल्हा रूग्णालयात ऊपचार सुरू असताना मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
सौ. अलका उमेश जावीर (वय 30, रा.मळेगांव, ता.बार्शी) असे मृत्यु झालेल्या विवाहितेचे नांव आहे. डॉ़ विकास कुमार वैदयकिय अधिकारी सिव्हील हॉस्पीटल सोलापुर यांनी पांगरी पोलिसात खबर दिली आहे. सौ.अलका जावीर ही विवाहिता 23 ऑक्टोंबर रोजी घरी स्वयंपाक करत असताना स्टोव्हचा भडका होऊन गंभिर जखमी झाली होती. बार्शी येथे प्रथमोपचार करून त्यांना सोलापुर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या खबरीवरून पांगरी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पांगरी पोलिस करत आहेत.