कळंब : शहरातील सर्वे नं. १०८ भाजीमंडई येथील दुकाने हटवण्या संदर्भात न. प. ने २८ व्यापा-यांना नोटीसा दिल्या होत्या. त्याच्या विरोधात स्थगिती आणण्यासाठी दोन गाळेधारकांनी बनावट दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात दोघावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलिसांनी अटक केली आहे.
कळंब मधील भाजीमंडई येथील गाळेधारकांना दुकाने काढण्यासंदर्भात नोटीसा दिल्यानंतर न्यायालयातून स्थगिती आणण्यासाठी भारत शंकरराव जाधव व रामचंद्र गंगाधर पाटील यांनी गाळ्याचा करार दस्ताऎवज न्यायालयास सादर केला होता, सदर दस्ताऎवजाची तत्कालीन मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी पडताळणी केली असता भारत जाधव व रामचंद्र पाटील यांचे जागा मासिक भाडे देण्याचा आदेश नगर परिषदेने दिला नसल्याचे आढळून आले, तसेच या दोघांनी न्यायालयात सदर केलेल्या दस्ताऐवजावरती नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांची बनावट स्वाक्षरी केल्याचे आढळून आले, या प्रकरणी प्रभारी मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात भारत शंकरराव जाधव व रामचंद्र गंगाधर पाटील या दोघावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भारत शंकरराव जाधव यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने त्यास दि. २६ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. चंद्रकांत सावळे हे करत आहेत.

- (बालाजी जाधव)