उमरगा (लक्ष्‍मण पवार) -: अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे गुवाहटी (आसाम) येथे द्वैवार्षिक महाअधिवेशन दि. 27 व 28 नोव्‍हेंबर दरम्‍यान आयोजित करण्‍यात आले असून या अधिवेशनास संघाच्‍या पदाधिकारी व सदस्‍यांनी उपस्थित राहावेत, असे आवाहन शिक्षक संघाचे नेते काकासाहेब साळुंके यांनी प्रसिध्‍दी पत्रकाद्वारे केले आहे.
    प्राथमिक शिक्षकांच्‍या राज्‍यस्‍तरीय व देशव्‍यापी ज्‍वलंत प्रश्‍न मार्गी लावण्‍यासाठी अधिवेशनात महत्‍त्‍वपूर्ण निर्णय होणार आहेत. या अधिवेशनास पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेसच्‍या अध्‍यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, रेल्‍वेमंत्री मल्लिकार्जून खरगे, मनुष्‍यबळमंत्री कपील सिब्‍बल, महासंघाच्‍या नेत्‍या सुलभाताई दोदे, रामपाल सिंग आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
    या अधिवेशनास उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील सर्व शिक्षक, केंद्रप्रमुख, मुख्‍याध्‍यापक आदींनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन संघाचे तालुकाध्‍यक्ष डी.एल. जाधव, सरचिटणीस रवि स्‍वामी, एन.एस. बदोले, के.सी. भालके, सुभाष चव्‍हाण, श्रीनिवास पवार आदींनी केले आहेत.
 
Top