नळदुर्ग :- सर्व मानव जातीचे कल्याण व्हावे, जागतिक पातळीवर शांतता नांदावी, असा उपदेश तथागत महात्मा गौतम बुध्द यांनी भारत भूमीतून सा-या जगाला दिला आहे, असे प्रतिपादन पितरंबा बौध्द विहार बेनटोटा श्रीलंका येथील बौध्द भिलू भन्ते संघरतन यांनी नळदुर्ग येथे कार्यकर्त्यांशी बोलताना केले.
बिदर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बौध्द स्तुपला भेट देण्यासाठी मलेशिया येथील बौध्द पर्यटकांच्या समवेत श्रीलंकन भन्ते संघरतन भारत दौ-यावर आले असून ते बिदर येथील बौध्द स्तुपास भेट देवून नळदुर्ग-तुळजापूर मार्गे औरंगाबादला जात असताना नळदुर्ग येथे रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, दादासाहेब बनसोडे, राजेंद्र शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, भारत ही बुध्दभूमी असून भगवान बुध्दाच्या रुपाने सबंध जगाला शांतीचा, अहिंसेचा व मानवतेचा संदेश मिळत आहे.
यावेळी सुशांत भूमकर, पप्पू पाटील यांच्यासह कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.