उस्मानाबाद : भातीय जनता पक्षाचे उस्‍मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पक्षाची जिल्हा कार्यकारिणी मंगळवारी जाहीर केली. या कार्यकारिणीमध्ये आठ जिल्हा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस, सहा चिटणीस व एका कोषाध्यक्षाचा सामावेश आहे.
    जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेली नवनियुक्त पदाधिका-यांची कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी जि.प. सदस्य रामदास कोळगे (उस्मानाबाद), राजेंद्र चौधरी (परंडा), जि.प. सदस्य कैलास शिंदे (उमरगा), दत्ता राजमाने (तुळजापूर),अतुल बागल (उस्मानाबाद), निशीकांत गायकवाड (कळंब), लक्ष्मण माने (उस्मानाबाद), चंद्रकांत मासाळ (भूम) आदींची वर्णी लागल आहे. तर नवनियुक्त जिल्हा सरचिटणीस म्हणून अँड. अनिल काळे (तुळजापूर), सतीश देशमूख (उस्मानाबाद), प्रभाकर मुळे (तुळजापूर), संताजी चालुक्य (उमरगा), नवनियुक्त जिल्हा चिटणीसपदी सौ. प्रमिला शेळके (परंडा), प्रा. विवेक टाचले (उमरगा), प्रा. नागनाथ पाटील (लोहारा), संजय जाधवर (कळंब) सौ. मंदाकिणी डोके (भूम), भिमाशंकर हासुरे (तुळजापूर), संध्याताई भूमकर (तुळजापूर), जिल्हा कोषाध्यक्षपदी तुळजापूरचे युवक कार्यकर्ते बाळासाहेब शामराज यांची वर्णी लागली आहे. जिल्हाध्यक्षांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीमध्ये 71 कार्यकर्त्यांचा सामावेश आहे. तर निमंत्रीतांसाठी 9 जणांचा सामावेश असून त्यामध्ये रामभाऊ पडवळ जीवन देशमुख, तानाजी शिंदे, दिलीपसिंह गौतम, डॉ. गोविंद कोकाटे, शेख अब्दुल, शेख अहेमद, उमेश कुलकर्णी, दत्तात्रय कुलकर्णी, रमन धोत्रीकर, अप्पाराव कापसे, कायम निमंत्रित म्हणून संजय निंबाळकर, अॅड. मिलींद पाटील, अॅड. खंडेराव चौरे यांची तर विशेष निमंत्रित भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजिमसिंह ठाकूर यांचा सामावेश आहे.
    या कार्यकारिणीतील सर्व नवनियुक्त उपाध्यक्ष सरचिटणीस, चिटणीस, कोषाध्यक्ष व सर्व सदस्यांचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, संजय निंबाळकर, अॅड. मिलींद पाटील, अॅड. खंडेराव चौरे, अविनाश कोळी आदींनी अभिनंदन केले.
 
Top