कळंब :- कळंब येथे तालुका क्रीडा संकुलावर उस्‍मानाबाद जिल्‍हा कुस्‍तीगिर तालीम संघ व राणाजगजितसिंह पाटील युचा प्रतिष्‍ठान कळंब यांच्‍यावतीने आयोजित भव्‍य अजिंक्‍यपद कुस्‍ती चाचणी स्‍पर्धेचा जिल्‍हा कुस्‍तीगिर तालीम संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते थाटात समारोप करण्‍यात आला.
    या स्‍पर्धेचे उदघाटन दि. 17 नोव्‍हेंबर रोजी प्राचार्य पांडुरंग भवर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी राष्‍ट्रवादीचे कळंब तालुकाध्‍यक्ष रामहरी शिंदे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून राष्‍ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्‍हाध्‍यक्ष प्रवीण यादव, राणादादा प्रतिष्‍ठानचे तालुकाध्‍यक्ष भारत खोसे, राष्‍ट्रवादीचे युवक तालुकाध्‍यक्ष अरुण चौधरी, लक्ष्‍मण मोहिते, प्रशांत लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्‍पर्धेस दोनशे मल्‍लांनी आपला सहभाग नोंदविला.
    या स्‍पर्धेत राज्‍यस्‍तरीय कुस्‍ती स्‍पर्धेसाठी प्रथम निवड झालेले स्‍पर्धक पुढीलप्रमाणे कंसात वजनी गट : कुमार गटातून पवन गायकवाड (42), दिपक सातपुते (46), पवन काळे (50), सिध्‍देश्‍वर फुलसुंदर (54), आनंद सोनमाळी (58), नितीन भुई (63), सागर सुरवसे (69), गजानन व्‍होरे (76), अंकुश ढाकवाळे (76 च्‍या पुढे) तसेच महाराष्‍ट्र केसरी माती या गटातून भारत पवार (55), दत्‍तात्रय मेटे (60), दादा फुराटे (66), प्रकाश भोरे (74), सदाशिव कारंडे (84), दत्‍ता दंडके (96) तर महाराष्‍ट्र केसरी गादी गटातून बालाजी बुरंगे (55), प्रविण देवकर (60), किरण जवळगे (66), अनिरूध्‍द धाबेकर (74), आबा चौधरी (84), महादेव घुले (96) त्‍याचबरोबर ग्रिकोरोमन गटातून भारत बुरंगे (55), आकाश जावळे (60), आकश जावळे (60), विकास चव्‍हाण (66), किरण मोरे (74), राहुल वाघमारे (85), केशव लांडगे (96), शिवाजी काळे (96 च्‍या पुढे) आदींची निवड करण्‍यात आली आहे.
    या स्‍पर्धेचे आयोजन न.प. चे गटनेते श्रीधर भवर यांनी केले. विजेते स्‍पर्धकांचा सत्‍कार जिल्‍हा कुस्‍तगीर तालीम संघाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्‍या हस्‍ते प्रमाणपत्र व ट्रॅकसुट देऊन गौरव करण्‍यात आले. कळंब येथे आखाडा निर्माण करण्‍यासाठी सर्वोतोपरी मदत करण्‍याचे आश्‍वासन आ. पाटील यांनी उपस्थितांना दिले. बक्षीस वितरण कार्यक्रामाला महाराष्‍ट्र कुस्‍ती परिष्‍ज्ञदेचे उपाध्‍यक्ष नागनाथ देशमुख, उस्‍मानाबाद जिल्‍हा कुस्‍तीचे संघाचे उपाध्‍यक्ष शिवाजीराव धुमाळ, जि.प.चे माजी सभापती सुर्यकांत टेकाळे, महाराष्‍ट्र शासनाचे कुस्‍ती मार्गदर्शक संदीप वांजळे, जि.प. सदस्‍य रामचंद्र लोमटे, राजसिंह निंबाळकर, इरशाद काझी, गणेश जाधव, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे सभापती लक्ष्‍मण थोरबोले, धनंजय वाघमारे आदींची उपस्थिती होती.
    या स्‍पर्धा यशस्‍वी करण्‍यासाठी राणादादा प्रतिष्‍ठानचे शहराध्‍यक्ष शिवाजी कराळे, सुहास इंगळे, सुजित भोसले, अरविंद भांडे, गुणवंत गटलेवार, अमोल बारटक्‍के, बप्‍पा चोंदे, पांडुरंग काळदाते, संतोष भंडारे, मिथुन बारटक्‍के, अक्षय तरटे, बाळू माळवदे, गणेश भांगे, अशोक भांगे आदींनी परिश्रम घेतले. 
(बालाजी जाधव)
 
Top