कळंब -: केंद्र शासनाच्या निर्णयानुसार शिधापत्रिका धारकाच्या कुटुंबाला केरोसीन, गहू, तांदूळ या रेशनच्या साहित्य खरेदीवर देण्यात येणारी सबसीडी थेट लाभधारक कुटूंबास मिळावी, या हेतूने शिधापत्रिका धारकाच्या कुटुंबाचे संयुक्त खाते राष्ट्रीयकृत बँकेत उघडण्याची मोहीम सध्या कळंब तालुक्यात सुरु असून यासाठी कळंबच्या तहसिलदारांनी बीड जिल्ह्यातील एका सामाजिक संस्थेला प्रती शिधापत्रिका धारकाकंकडून संयुक्त खाते काढण्यासाठी शंभर रुपये घेण्याचे लेखी पत्र दिले आहे. मात्र सदर संस्थेकडून शंभर रुपये ऐवजी 130 रुपये घेतले जात आहे.
सदर खाते बँकेत उघडण्यासाठी झिरो बॅलेन्सवर खाते उघडण्याचे केंद्र शासनाचे निर्देश असताना सेवाभावी संस्था आणि तहसिलदार यांच्या संगणमताने शिधापत्रिका धारकांची लूट करणे सुरु असल्याचे संभाजी ब्रिगेडचे कळंब तालुकाध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी उपविभागीय अधिकारी कळंब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच कळंब ताुका वगळता उस्मानाबाद जिल्ह्यातील इअन्य कोणत्याही तालुक्यात व त्यातील गावामध्ये कोठेही अशी मोहीम सुरु नाही. मात्र कळंब तालुक्यातच हा प्रकार कसा? कळंब तालुक्यातील काही गावांमधून फॉर्म व पैसे घेऊन या संस्थेचे करुन कार्यवाही करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने धडक मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

(बालाजी जाधव)