कळंब :- शहरातील वीज वितरण कंपनीच्‍या कार्यालयासमोर येरमाळ्याहून येणारा टेम्‍पोची मोटारसायकलस्‍वारास वाचवण्‍याच्‍या प्रयत्‍नात जोरदार धडक होऊन टेम्‍पो रस्‍त्‍याच्‍या कडेला पलटी झाला. यात सहाजण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्‍याने त्‍यांना अंबेजोगाई येथे उपचारासाठी पाठविण्‍यात आले आहे. ही घटना मंगळवार रोजी दुपारी चार वाजण्‍याच्‍या सुमारास घडली.
    सय्यद अली (वय 20 वर्षे, रा. धारुर), शेख मोहीम मुन्‍सी (वय 21, रा. धारुर), शेख मोसीन हमीद (वय 18), शेख रहिम अन्‍सर (वय 18), शेख शफीक ईस्‍माईल (वय 30), शेख शफीक जाफर (वय 50 वर्षे) सर्व रा. केज, जि. बीड असे अपघातात जखमी झालेल्‍यांचे नावे आहेत. येरमाळा (ता. कळंब) कडून येणारा कापूस भरलेला टेम्‍पो (क्रमांक एम.एच. 23 सी. 1455) हा भरधाव वेगात येत असता कळंबकडून येरमाळा कडे जाणारी सुझूकी मोटारसायकल (क्रं. एमएच 22 सी. 1115) यांची वीज वितरण कार्यालयासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्‍ये टेम्‍पोतील सहाजण जखमी झाले आहेत. जखमीपैकी शेख शफीक ईस्‍माईल व शेख शफिक जाफर हे गंभीर जखमी झाले असून त्‍यांना अंबेजोगाईला उपचारासाठी पाठविण्‍यात आले आहे. तर इतर चौघांवरती कळंबच्‍या ग्रामीण रुग्‍णालयात उपचार सुरु असल्‍याची माहिती कळंब ग्रामीण रुग्‍णालयामधून मिळाली आहे. याबाबतची नेांद कळाब पोलिसात करण्‍यात आली आहे. रम्‍यान अपघाताची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक मारुती शेळके, पो.कॉं. लक्ष्‍मण शिंदे, मधुकर शेवाळे, मोमीन, जाधव यांनी घटनास्‍थळी भेट देऊन पंचनामा केला.
 
Top