नळदुर्ग -: येथील श्री.ष.ब्र. 108 निर्विकल्‍प समाधीस्‍थ राजगुरु श्री शिवलिंगेश्‍वर शिवाचार्य यांचा पुण्‍यतिथी सोहळा मंगळवार दि. 26 नोव्‍हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्‍न होत आहे.
    या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अणदूर (ता. तुळजापूर) येथील निलकंठेश्‍वर मठाचे शिवयोगी शिवाचार्य महास्‍वामीजी हे आहेत. तर केसरजवळगा विरक्‍त मठाचे जडिबसवलिंगेश्‍वर महास्‍वामीजी, हिरेनागाव विरक्‍त मठाचे जयशांतलिंग महास्‍वामीजी, कमतगी संस्‍थान मठाचे हुच्‍चेश्‍वर महास्‍वामीजी, अमिनगड विरक्‍त मठाचे शंकरराजेंद्र महास्‍वामीजी, मुनवळ्ळी येथील सोमेश्‍वर मठाचे मुरुघेन्‍द्र महास्‍वामीजी, अक्‍कलकोट विरक्‍त मठाचे बसवलिंग महास्‍वामीजी, नळदुर्ग येथील शिवलिंगेश्‍वर मठाचे बसवराज शिवाचार्य महास्‍वामीजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    सोमवार रोजी जागरण व प्रवर्चनाचा कार्यक्रम पार पाडले. मंगळवार रोजी सकाळी सहा वाजता कर्तृगदगीस महारुद्राभिषेक होणार आहे. त्‍यानंतर शिवदिक्ष व आय्याचार होऊन सकाळी साडे दहा वाजता धर्मसभा होईल. तरी परिसरात भक्‍तांनी याचा लाभ घ्‍यावे व शिष्‍यगणाने व नळदुर्ग शहर समाज बांधवाने तन-मन-धनाने सेवा करुन गुरुचा आशिर्वाद घेण्‍याचे आवाहन श्री शिवलिंगेश्‍वर सदभक्‍त शिष्‍य गण नळदुर्ग यांनी केले आहे.
 
Top