बार्शी : ब्रिटीश सरकारच्या पूर्वीपासून प्रथा परंपरा व संस्कारांची जोपासना करत बार्शीतील हिंदू व मुस्लिम समाज बांधव नवीन वर्षारंभ (मोहरम) च्या सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी बार्शीतील प्रसिध्द झेंडेवाली सवारीचे दर्शन घेतले.
राऊळ गल्ली येथील बुधलीकर पीर (महेबुब सुबानी दर्गा) या ठिकाणी असलेल्या नवसाच्या झेंडेवाली सवारी परंपरेचे महत्व पुरातन काळापासून आहे. मौलाली सवारीच्या नंतर अग्रक्रमाने झेंडेवाली सवारी बार्शीतील हिंदू मुस्लिम समाजाचे श्रध्दास्थान आहे. पूर्वीपासूनच सातारकर परिवार या सवारीच्या उत्सवाची देखभाल व संस्काराची जोपासना करित आहेत. सध्याच्या पिढीतील रङ्खिक सातारकर हे मोठ्या हौसेने सण साजरा करतात.
प्रतिवर्षाप्रमाणे नवीन वर्षाच्या ८ तारखेला रात्री ८ वाजता तसेच १० तारखेला सकाळी ९ पासून रात्री ७ पर्यंत झेंडेवाली सवारीची सवाद्य मिरवणुक काढण्यात येते. या सवारीसाठी मियॉंभाई सय्यद हे धार्मिक विधीद्वारे मागील ३१ वर्षांपासून सेवा देत आहेत. पहिल्या दिवशी येथील चौकात असलेल्या नेहमीच्या ठिकाणी सवारीच्या नावचा आवेला (वीटा, माती यांनी तयार केलेला व चुना लावलेला) तयार केला जातो. धार्मिक विधीद्वारे मोहरमच्या सणाची सुरुवात केली जाते. झेंडेवाली बरोबरच इमामे कासम सवाई (कुंभारी) व नैल्या हैदर (लाडूभाई) या आणची दोन सवारी (पंजाची) स्थापना या ठिकाणी केली जाते. मिरवणुकीत सुरुवातीपासून ढोल, ताशा, मंगल वाद्यांच्या गजर केला जातो. सर्वप्रथम राऊळ गल्ली या ठिकाणी सवारी येते तेथून मल्लाप्पा धनशेट्टी रोड, मदिना मश्जिद, शाहीर अमर शेख चौक, पांडे चौक, महात्मा गांधी शॉपींग सेंटर, नगरपालिका समोर, माळे गल्ली, भगवंत मंदिराच्या मागील कोठारी घराजवळून सुतार नेट, हांडे गल्ली, बेदराई गल्ली, काझी गल्ली, ङ्कहेदवी नगर, कसबा पेठ, एकवीराई ङ्कंदिरापासून जुनी वेस, ङ्कंगळवार पेठ, वीर सावरकर चौक, पटेल चौक, किराणा रोड, दाणे गल्ली, रोडगा रस्ता, आडवा रस्ता, तेलगिरणी चौकातून शिवाजी आखाडा व पुन्हा मुळ जागी आल्यावर तसेच गावातून मिरवणुक सुरु असतांनाही नवस केलेले लोक आपला नवस फेडण्यासाठी मोठी गर्दी करतात. बुधलीकर पीर या मुळ जागेवर आल्यावर सवारी शांत केली जाते. यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप केले जाते. ङ्कुंबई पुणे आदि मोठ्या शहरातून भाविक मोठ्या श्रध्देने आपले नवस फेडण्यासाठी अथवा नव्याने आपले प्रश्नांसाठी नवस करण्यास येतात. सदरच्या ठिकाणी सर्व जाती धर्मातील लोक मोठ्या भक्तिभावाने समरस झालेले पहायला मिळतात. मिरवणुकीदरम्यान बार्शी पोलिसांनी चांगल्या शिस्तीत बंदोबस्त बजावला.