नळदुर्ग -: क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्‍हा क्रीडा परिषद, जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्‍हा कुस्‍तीगिर संघ जळगाव यांच्‍या संयुक्‍त विद्यमानाने आयोजित राज्‍यस्‍तरीय शालेय (ग्रीको रोमन) कुस्‍ती स्‍पर्धेत किलज (ता. तुळजापूर) येथील सचिन राठोड याने तृतीय क्रमांक पटकाविले आहे.
    तुळजापूर तालुक्‍यातील सलगरा दिवटी येथे कै. अंबुमाता महाविद्यालयामध्‍ये इयत्‍ता अकरावीत सचिन राजेंद्र राठोड हा शिकत असून नुकतेच जळगाव येथे झालेल्‍या राज्‍यस्‍तरीय कुस्‍ती स्‍पर्धेत भाग घेऊन 19 वयोगटातून 96 किलो वजनगटामध्‍ये त्‍याने तृतीय क्रमांक पटकाविले. त्‍यास जिल्‍हा क्रीडा अधिकारी जळगाव, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा नाशिक, आयुक्‍त क्रीडा व युवक सेवा महाराष्‍ट्र राज्‍य पुणे आदींच्‍या हस्‍ते प्रशस्‍तीपत्र देऊन गौरविण्‍यात आले. त्‍याच्‍या या यशाबद्दल संस्‍थाचालक उत्‍तम लोमटे, महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र लोमटे आदींनी अभिनंदन केले आहे. तर जिल्‍हा कोच संदीप वांचळे, तुळजापूर तालुका क्रीडाअधिकारी पटेल, क्रीडा शिक्षक सिताराम चव्‍हाण व त्‍याचे वडील किलजचे विद्यमान सरपंच राजेंद्र राठोड आदींचे त्‍याला मार्गदर्शन लाभले.
 
Top