बार्शी : थंडीला सुरुवात झाल्यानंतर बार्शीत प्रवाशी पक्षांचे आगमन सुरु झाले आहे. बार्शीतील गणेश तलाव येथे पक्षीमित्र प्रतिक तलवाड यांनी यावेळी पक्षांचे निरीक्षण केले असता शिकार्‍यांकडून त्यांच्यासाठी सापळा लावल्याचे लक्षात आल्याने त्यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून सदरचा प्रकार सांगितला. सदरच्या शिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन यावेळी वन विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले.
- (मल्लिकार्जून धारुरकर)

 
 
Top