नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न सन्मान जाहीर झाला
आहे. राष्ट्रपती भवनातून सचिनच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला त्या दिवशीच त्याला ही अनोखी भेट भारत सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारा सचिन हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे
भारतरत्न मिळवण्यातही सचिनने विक्रम केला आहे. देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मिळविणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. काही वर्षांपासून सचिनला भारतरत्न देण्याची मागणी होत होती. त्यासोबतच हॉकेचे जादूगार ध्यानचंद यांना देखील भारतरत्न देण्याची मागणी होती.
सचिनचे बंधु अजित यांनी या सन्मानाचे स्वागत केले आहे. ही आनंददायी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, सचिनला अनेक सन्मान मिळाले आहेत. हा देशातील सर्वोच्च सन्मान मिळाल्याने आनंद झाला आहे. हा सचिनबरोबरच क्रिकेटचा सन्मान आहे.