पांगरी :- कांही माणसे अनंतात विलीन होऊनही आपल्या सामाजिक कार्यामुळे आपल्या स्मृती पाठिमागे ठेऊन जाऊन लोकांना हुरहुर लावुन जातात. असेच निस्वार्थीपणे दीन, दलित व गोरगरिबांसाठी झटणारे कै. आप्पासाहेब चव्हाण हे नेतृत्व होत. कै. चव्हाण यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी कॅन्सर सारख्या भयानक आजारावर मेफत निदान व उपचार शिबीर आयोजित करून त्यांना खरोखरच आदरांजली वाहण्याचे काम केल्याचे भावोदगार सोलापुर जिल्हयाचे पालकमंत्री ना. दिलीपराव सोपल यांनी काढले.
पांगरी (ता. बार्शी) येथे पांगरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते कै.शंकर (आप्पा) चव्हाण यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित मोफत कर्करोग निदान उपचार व निराधार लाभार्थांच्या मार्गदर्शन शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ना. सोपल हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले वस्तीगृहाचे संस्थापक वसंत गरड हे होते. शिबिरात 250 रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली. तसेच 300 लाभार्थांचे निराधार श्रावणबाळ, इंदीरा आदी विविध शासकीय योजनेतील फॉर्म भरून घेण्यात आले.
ना. सोपल पुढे बोलताना म्हणाले की, कै. आप्पा हे आपला संसार बाजुला ठेऊन लोकांसाठी झटुन त्यांच्या अडचणी समस्या सोडवुन त्यांचे समाधान करण्यातच धन्यता मानली होती. त्यांनी त्यांच्या हयातील आजारी पिचलेल्या गोरगरिबांसाठी सतत आपला वेळ देऊन त्यांच्या गरजांची पुर्तता करण्याचे बहुमोल कार्य केले. कोणत्याच आजाराला आता घाबरायचे कारण राहीले नसुन त्यावर रामबाण उपचार उपलब्ध आहेत, असेही सोपल म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी युवक क्रॉग्रेसचे बार्शी तालुकाध्यक्ष विजय ठोंगे, शहराध्यक्ष मनीष चौव्हान, जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडे, बार्शी पंचायत समितीचे माजी सभापती युवराज काटे, नंदकुमार काशिद, कमलाकर पाटील, विक्रांत गरड, पोपट डमरे, स्वप्नील काळे, धनंजय तौर, बाबा जाधव , कारीचे सरपंच इम्रान मुलाणी, उपसरपंच अतुल चालखोर, खाशेराव विधाते यांच्यासह बार्शी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.
ना.सोपल यांच्या हस्ते कै. आप्पा चव्हाण यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिबीर यश्स्वी करण्यासाठी विक्रांत गरड, अजित पोफळे, नागेश राऊत, सागर भराडे, मनोज मोरे, किरण गरड, समाधान पोफळे, रितेश पौळ, गोरख चांदणे, नवनाथ भराडे, उमेश चांदणे, दिपक शेळके, गणेश गोडसे, नाना निंबाळकर, किरण गाढवे यांच्यासह कै. आप्पासाहेब चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन विलास गोडसे यांनी केले.
(गणेश गोडसे)