सोलापूर :- जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत एचआयव्ही टेस्टींग कीट प्रत्येक एएनसी केंद्रावर त्वरीत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. तसेच महापालिकेने एक एआरटी सेंटर सुरु करण्यासाठी तसा प्रस्ताव जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण समितीने महापालिकेकडे सादर करावा. तसेच ज्या ठिकाणी जनजागृतीची गरज आहे अशा ठिकाणी जनजागृतीची सर्व साधने पुरविण्याचेही त्यांनी सुचित केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांनी जिल्ह्यात तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तींची माहिती दिली. यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर 2013 दरम्यान 38 हजार 810 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यामध्ये 1 हजार 71 व्यक्ती बाधीत आढळून आल्या. तर 29 हजार 40 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली त्यापैकी 31 बाधीत आढळून आल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीस डॉ. कानगुळे, निरामय आरोग्यधामच्या संचालिका सीमा किणीकर यांच्यासह समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.