मुंबई -: महाराष्ट्र शासनाने दि. 5 डिसेंबर, 2012 च्या अधिसूचनेद्वारे मोहरम निमित्त दि. 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली सुट्टी रद्द करुन त्याऐवजी परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 मधील तरतुदीच्या अधीन राहून ही सुट्टी आता दि. 15 नोव्हेंबर रोजी जाहीर केली आहे.
    दि. 14 नोव्हेंबर, रोजी राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालये व राज्य शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील. याबाबतची अधिसूचना 12 नोव्हेंबर रोजी निर्गमित करण्यात आली आहे.

     राज्य शासनाने मोहरम सणाकरीता जाहीर केलेली दि. 14 नोव्हेंबर रोजीची सुटी दि. 15 नोव्हेंबर रोजी देण्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने दि. 12 नोव्हेंबर रोजीअधिसूचना जाहीर केली आहे. यामुळे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी राज्य शासकीय, निमशासकीय कार्यालये व राज्य शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व नागरी व स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये सुरु राहतील, असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.      
 
Top