नळदुर्ग :- पाच वर्षापूर्वी नळदुर्ग शहरामध्ये घरकुल योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र ही योजना अर्धवट असून बांधण्यात आलेली घरकुले अद्यापपर्यंत लाभार्थ्यांना दिले नाहीत. त्याचबरोबर घरकुल योजना पूर्ण करुन लाभार्थ्यांना तात्काळ द्यावे, याकरीता हक्काचं घरकुल मिळविण्यासाठी येत्या दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नळदुर्ग येथील लोकमान्य वाचनालय येथे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी लाभार्थ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे सामाजिक कार्यकर्ते सुशांत भूमकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप कुलकर्णी, नगरसेवक अमृत पुदाले यांनी केले आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, नगरपालिकेने मोठा गाजावाजा करत 2008 साली शहरात घरकुल योजना सुरु केली. त्यावेळी नगरसेवकांच्या सांगण्यावरुन समाजातील गरीब, वंचित, ज्याला रहावयास स्वतःचे घर नाही अशा कुटुंबातील व्यक्तींनी आपला लोकवाटा नगरपालिकेत जमा केला. वास्तविक पाहता ही योजना शासन गरीब व ज्याला स्वतःच असं आपलं घर नाही अशा वंचित व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकासाठीच राबवते व आपल्यालाही आता हक्काचं असं आपलं घर मिळणारं याच भोळ्या आशेने लोकांनी भावनीक होऊन कोणी व्याजाने पैसे काढून, कोणी उसनवारी घेऊन तर आमच्या माता भगिनींनी प्रसंगी आपल्या मंगळसुत्रातील काही मणी विकून अथवा गहाण ठेवून घरकुलासाठी लोकवाटा नगरपालिकेत भरला. परंतु अठरा महिन्यात घरकुल आपल्या ताब्यात देण्याचे आश्वासन देणारी नगरपालिका आज पाच वर्षे उलटली तरी गप्प का? का कोणताच नगसेवक या कामी जनतेची बाजू घेऊन हे काम पूर्ण करुन घेत नाही. 1208 घरकुले मंजूर असताना व शासनाच्या निम्मा निधी खर्ची केलेला असताना सुध्दा आज पाच वर्षापासून लाभार्थी घरकुलापासून वंचित का? याला जबाबदार कोण? यात कोणा-कोणाचे हात रंगले असल्याचा सवाल करुन पुढे म्हटले आहे की, कोणाचा घास गिळायला निघालात? ज्यांच ताटचं रिकामं आहे त्यांचा, अरे तुमची तर घरे भरलेली आहेत. तुम्हास काय कळणार गरीबाची व्यथा? तुम्ही उपवास केला म्हणून एखादेवेळी उपाशी झोपता परंतु खावयास काही नाही म्हणून उपाशी झोपावे लागते. त्या दिवशी फक्त अश्रुच प्यावे लागतात. हा विचार जरी मनात आला तरी मन भरुन येतं, आपण एवढे कसे निष्ठूर झालात. कुणाच्या टाळूवरचं लोणी खायला निघालात जे केव्हाच गरीबीत मेलेले आहेत त्यांच्या तुम्ही आरसीसी घरात राहता. मग तुम्हास मतदान करणा-या मतदार राजास साध्या हक्काच्या घराविनावच वेशीवर टांगता अरे जनाची नाही तर मनाची तरी बाळगायला हवी होती. आपल्या घराची किंमत काय असते हे आपणास नाही कळणार, त्यासाठी गरीबीतच जन्मावे लागते असो आपणास उरलीसुरली थोडी जरी गरिबीची आस्था असल्यास जी बांधलेली घरे आहेत, ती तात्काळ दुरुस्त करुन ती त्वरीत ख-या लाभार्थ्यांना हस्तांतरीत करुन ताब्यात द्यावीत व जी अपुर्ण शिल्लक आहेत, ती कामे तात्काळ करावीत अन्यथा यापुढे न.प. प्रशासना विरोधात जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.