उस्मानाबाद - शहरातून पंधरा दिवसांपूर्वी चोरीस गेलेल्या टँकर चोरीप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींना शहर पोलिस ठाण्यातील वर्षभरापूर्वीच्या एका गुन्ह्याच्या तपासात ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने दोघांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
१७ ऑक्टोंबरच्या पहाटे उस्मानाबाद शहरातील सांजा रोडवरील पेट्रोलपंपावरून चोरीस गेलेल्या टँकरचा ट्रॅकर प्रणालीमुळे उस्मानाबाद पोलिसांनी शोध लावला. याचदरम्यान सांगली जिल्ह्यातील वाहन चोरट्यांच्या भंगार कारखान्याचाच भांडाफोड झाला. यावेळी उस्मानाबाद पोलिसांनी परवेज खान, बंगळुरू (कर्नाटक) व इम्तीयाज मुजावर (कोल्हापूर) या दोघांना अटक केली. त्यांना प्रथम २७ ऑक्टोबर व नंतर एक दिवसाची पोलिस कोठडी वाढवून मिळाली. दरम्यान या कोठडीची मुदत संपल्यानंतर अशाच प्रकारच्या शहर हद्दीतील अन्य गुन्ह्याच्या तपासासाठी या दोघांना उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. शहरातील २०१२ मध्ये चोरीस गेलेल्या ट्रकच्या तपासासाठी दोघांनाही ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात शहर पोलिस ठाण्यात सीआर क्रमांक २०४/१२ याप्रमाणे गुन्हा नोंद आहे.