उस्मानाबाद - बंद असलेले रेल्वेचे गेट उघड असे सांगून एका रेल्वे गेटमनला मोटारसायकलस्वाराने मारहाण केल्याची तक्रार ढोकी पोलिसात दिल्यावरुन मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ढोकी (ता.उस्मानाबाद) येथे घडली.
शेख महंमद रफिक नासिर (वय ४४, रा. खाजानगर, उस्मानाबाद) असे मारहाण झालेल्या रेल्वे गेटमनचे नाव आहे. ढोकीजवळील रेल्वे गेट क्रमांक ३४ येथे शेख हे कर्तव्यावर होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास पंढरपूर-निजामाबाद या पॅसेंजर रेल्वेची वेळ झाल्याने शेख यांनी गेट बंद केले. यावेळी तेथे आलेल्या एका हिरोहोंडा स्प्लेंडर (क्रमांक एमएच-०९-सीओ ५२४७) च्या मोटारसायकलस्वाराने गेट उघडण्यास सांगितले. याला गेटमनने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ करून गेटमन शेख यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील मोबाइल फोडून आरडाओरड करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरून मोटारसायकलस्वाराविरोधात ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.