उमरगा -: मुरुम (ता. उमरगा) येथील बसस्थानकाजवळ ट्रकने धडक दिल्याने एका इसम जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून याप्रकरणी मुरुम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मसाजी शहिबा बनसोडे (वय 60, रा. अण्णाभाऊ साठेनगर, मुरुम, ता. उमरगा) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वृध्दाचे नाव आहे. यातील मसाजी बनसाडे हे बसस्थानकाकडे चालत जात होते. यावेळी अक्कलकोट रस्त्याकडे जाणा-या भरधाव ट्रकने (क्र.एमएच-04-एच 1197) त्यांना जोराची धडक दिली. यात ते गंभीर जखमी होऊन त्यांची जागीच मृत्यू झाला. यावेळी ट्रकचालकाने न थांबता पळ काढला. यामुळे शहरातील काही तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग केला. याप्रकरणी भगवान बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.