नळदुर्ग -: राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथे असलेल्या एका अवघड वळणावरील घाट माथ्यावरुन रस्त्याचे संरक्षण कठडा भरधाव ट्रकने तोडून सुमारे शंभर मीटर खोल दरीत कोसळुन झालेल्या आपघातात टावर्स ट्रकचा पार चुराडा झाला आहे. या दुर्घटनेत जिवित हानी झाली नाही. तर मोठे नुकसान झाले असून हा अपघात महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उमरग्याहून सोलापूरकडे फरशी घेऊन जाणारी मालट्रक रस्त्याचा कठडा तोडून तब्बल शंभर मीटर खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये जिवीतहानी झाली नसली तरी ट्रकचा चुराडा होऊन मोठे नुकसान झाले आहे. सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग ते नळदुर्ग या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या महामार्गावर इतके खड्डे पडले आहेत की, खड्डयात महामार्ग शोधावा लागतो. गेल्या अनेक महिन्यांपासून या महामार्गाची अशी अवस्था झालेली असतानाही शासन किंवा संबंधित विभागाने या महामार्गाची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या महामार्गावरून जाताना प्रवाशी व वाहनचालकाना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग व भारतीय राजमार्ग प्राधिकरण या दोन विभागाच्या वादात या महामार्गांच्या दुरुस्तीचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले आहे.
महामार्गावरील खड्डे चुकविताना अनेकदा वाहन चालकांचा वाहनावरील नियंत्रण सुटून अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहेत. नळदुर्गजवळ आपलं घरच्या वळणावर महामार्गावरील खड्डे चुकविताना उमरग्याहून सोलापूरकडे फरशी घेऊन जाणारा मालट्रक क्रं. के.ए. 56/0438 हा रस्त्याचा कठडा तोडून सुमारे शंभर मीटर खोल दरीत कोसळल्याने ट्रकचा पार चुराडा होऊन तुकडेतुकडे झाले आहे.