नळदुर्ग -: अणदूर (ता. तुळजापूर) येथील वत्सलानगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जागेवर झालेले अतिक्रमण प्रशासनाने त्वरीत हटवावे, अन्यथा याविरोधात लोकशाही पध्दतीने दि. 15 नोव्हेंबरनंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा वत्सलानगर (अणदूर) येथील युवकांनी दिला आहे.
वत्सलानगर हा अणदूरचा एक भाग असून या ठिकाणी भूकपांनंतर गावातील अनेक नागरिकांनी स्थलांतर केले. या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा ही या वत्सलानगरच्या मध्यवर्ती ठिकाणी असून या शाळेच्या जागेवर अनेकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण करुन आपले बस्तान बसविले आहे. या शाळेच्या आवतीभोवती मोठ्याप्रमाणावर अवैध अतिक्रमण झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फार मोठा त्रास होत आहे. हे अतिक्रमण शाळेच्या जागेची मोजणी करुन त्वरीत हटवावे व संरक्षण भिंत घ्यावे, अन्यथा 15 नोव्हेंबरनंतर शाळेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आला असून सदरील निवेदनावर नालसाब शेख, निलेश मुळे, राजेंद्र सुर्यवंशी, राजकुमार आलुरे या चार युवकांच्या सह्या आहेत. या निवेदनाची एक प्रत तुळजापूर तहसिलदार, ग्रामविकास अधिकारी व नळदुर्ग पोलीस ठाण्यासही देण्यात आल्या आहेत.
लेखी आश्वासन न पाळल्याने परत उपोषण
अणदूर येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या जमिनीची तातडीची मोजणी फीस भरुन मोजणी करुन घेऊन शाळेच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवावे, यासाठी दि. 2 ऑक्टोबर 2013 रोजी गावातील पाच तरुण ग्रामपंचायतीसमोर उपोषणास बसले होते. तेंव्हा त्यांना विस्तार अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर, ग्रामविकास अधिकारी, अणदूर शालेय व्यवस्थापन समितीचे लेखी आश्वासन देऊन सात दिवसात मोजणी फीस भरुन मोजणी करुन बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यात येईल, असे सांगून उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविले होते. त्याला वीस दिवस उलटून गेले तरी अद्याप मोजणी फीसही भरली नाही आणि अतिक्रमण हटविण्यासंदर्भात हालचालही केली नाही म्हणून परत शाळेसमोर लवकरच आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन गटविकास अधिकारी, तुळजापूर यांना देण्यात आले. या निवेदनावर राजकुमार आलुरे, राजेश देवसिंगकर, निलेश मुळे, अनिल गायकवाड आदी उपोषणकर्त्यांची स्वाक्षरी आहे. या निवेदनाची प्रती तुळजापूर तहसिलदार, ग्रामविकास अधिकारी व नळदुर्ग पोलीस ठाण्याकडे देण्यात आल्या आहेत.