उस्मानाबाद :- जिल्हा परिषदेतंर्गत वर्ग-४ परिचर या पदासाठी दि. २६ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सदरील लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी osmanabad.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. तेव्हा सर्व उमेदवारांनी यांची नोंद घ्यावी, असे निवड समिती सदस्य सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.