मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांतता नांदावी; तसेच गोरगरीब जनतेचे आयुष्यही या प्रकाश पर्वाने उजळावे, असे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि प्रकाशाचा उत्सव आहे. त्यातून आपले आयुष्य तेजोमय करण्यासाठी पर्यावरणाचे भान राखून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा. वायू आणि ध्वनिप्रदूषण करणारे फटाके न फोडता पर्यावरणाचे संवर्धन करावे. हा आनंदमय उत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा. आपल्या आनंदात समाजातील दुर्बल, वंचित आणि उपेक्षित घटकांनाही सामावून घ्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात केले आहे.