उस्मानाबाद -: भ्रष्टाचार ही मनाची विकृती आहे. मात्र, प्रत्येकाने स्वतापुरते ठरविले तर भ्रष्टाचाराची ही विकृती कमी होण्यास मदत होऊ शकते. चांगल्या विचारांची पणती तेवत ठेवली तर हे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी केले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २८ आक्टोबर ते २ नोव्हेंबर हा कालावधी दक्षता जनजागृती सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला. त्याचा समारोप येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कार्यालय प्रमुखांचे योगदान या विषयावर चर्चा झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक नईम हाश्मी, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, संतोष राऊत, राम मिराशे, जिल्हा नियोजन अधिकारी एम.के. भांगे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे म्हणाले की, वेगवेगळ्या पातळीवर दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमामुळे किमान भ्रष्टाचार विषयाची चर्चा सर्वसामान्य पातळीवर होत आहे. मात्र, प्रत्येक क्षेत्रात चांगली माणसे असतात. या माणसांनी ठरविले आणि अनैतिक गोष्टींना पाठबळ मिळाले नाही तर भ्रष्टाचार मुक्ती होऊ शकते. यावेळी डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते या सप्ताहानिमित्त आयोजित निबंध व घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
पोलीस अधीक्षक सचिन पाटील म्हणाले की, भ्रष्टाचाराचे स्वरुप व व्याप्ती आता बदलली आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वतापुरता विचार केली तर ही विकृती कमी होऊ शकते.
श्रीमती करमरकर यांनी विविध क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दल थोडक्यात विवेचन केले. यात आर्थिक, बौद्धिक, नैतिक भ्रष्टाचाराबद्दलची उदाहरणे त्यांनी दिली. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी कामकाजात पारदर्शकता, तंत्रज्ञानाचा वापर, तन्मयता, वेळेत काम मार्गी लावणे, कायदेशीर तरतूदींची माहिती घेऊन त्याचे कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देणे हे उपाय अवलंबता येतील, असे सांगितले.

हाश्मी यांनी जनजागृती सप्ताहात आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती दिली. यानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत ऐश्वर्या बैरागी, शीतल नरवडे, आरती गायकवाड, वर्षा गायकवाड, अपर्णा किरकसे, अमोल राऊत, श्रीनिवास कसबे, स्नेहा बनसोडे, श्रृती भोसले या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेत तर शीला थोरात, वैभव झाडे, विक्रांत बोचरे यांनी घोषवाक्य स्पर्धेत पारितोषिक मिळवले. या सप्ताहातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उप अधीक्षक हाश्मी यांच्यासह पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले व एफ.सी. राठोड, सहायक पोलीस हवालदार सी.एन. देशमुख, हेडकॉन्स्टेबल डी.एस.भगत, पोलीस नाईक सुधीर डोरले, पोलीस कॉन्स्टेबल नितीन तुपे, नितीन सुरवसे व बालाजी तोडकर यांनी परिश्रम घेतले.