मुंबई : दिवाळी हा सण प्रकाशाचे महत्व सांगणारा आहे. यासाठी ज्यांच्या आयुष्यात अद्याप अंधार आहे, अशा वंचितांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी करुया, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.
राज्यातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा, समृद्धी आणि राज्याच्या समतोल विकासासाठी आपण कटीबद्ध राहणार असल्याची ग्वाहीही चव्हाण यांनी राज्यातील जनतेला दिवाळीचा संदेश देताना दिली आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात की, दिपावलीचा सण हा आनंद आणि चैतन्य घेऊन येतो, नव्या कामांची सुरुवात करुन आपल्या आयुष्याला तसेच समाजाला देखील एक चांगले वळण देण्यासाठी हा सण आपल्याला प्रेरित करतो. आज आपले राज्य सर्व आव्हानांना ताकदीने सामोरे जात आहे. आपल्यासमोरील लक्ष्य आहे ते राज्याला अधिक वैभवशाली बनविण्याचे. या सगळ्या वाटचालीत समाजातील दुर्बल आणि मागासलेल्या घटकांच्या आयुष्यातील अंधार दूर करुन त्यांचे आयुष्य प्रकाशमान करायचे आहे. दिवाळी हा सण सुख आणि आनंद वाटण्याचा आहे. यात जाती धर्माला स्थान नाही. बंधुभावाचा आणि सौहार्दाचा संदेश मनाशी बाळगून आपण पुढील वाटचाल केल्यास खऱ्या अर्थाने विकास साधू अशी मला खात्री वाटते.
राज्याने उद्योगात चांगली आघाडी घेतली असून भविष्यात देखील ती टिकून राहील. अनेक रोजगार यातून निर्माण होतील. शेतीला भरभराटीचे दिवस आणण्यासाठी आम्ही उचललेल्या पावलांमुळे बळीराजाचे भविष्य देखील उज्वल होणार आहे. प्रकाशाचे प्रतिक असणा-या ऊर्जेच्या उत्पादनातील अडथळे दूर सारुन लवकरच आपले राज्य पूर्णपणे प्रकाशमान होण्याकडे आपली वाटचाल सुरु आहे. अमंगलाचा मुकाबला करीत मंगलमय पर्वाची सुरुवात करणारी ही दिवाळी सर्वांना आनंदाची जावो, असेही मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात.