उस्मानाबाद :- जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत राज्य शासनाने मोलाची मदत केली. मागेल त्याला काम तसेच टंचाई उपाययोजनांद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी छावण्या अशा प्रकारे मदत करण्यात आली. राज्य शासन नेहमीच कठीण प्रसंगी नागरिकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. नागरिकांनीही शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेतला पाहिजे. जिल्ह्यातील तरुणांनी या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी इर्ला (ता. उस्मानाबाद) येथे केले.
उस्मानाबाद इर्ला येथे ना. चव्हाण यांच्या हस्ते आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा व कब्रस्थान संरक्षण भितीचे भुमिपुजन सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी तुळजापूर विकास प्राधिकरणाचे सदस्य अप्पासाहेब पाटील, उस्मानाबाद जनता बॅंकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, जि. प. सदस्य सुधाकर गुंड, सरपंच प्रयागताई क्षीरसागर, उपसरपंच शिवाजी कांबळे, धनंजय रणदिवे, नितीन बागल आदींची उपस्थिती होती.
राज्य शासनाने ५० टक्के पेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांना १२३ कोटींहून अधिक मदतीचे वाटप केले. निराधारांना संजय गांधी व श्रावण बाळयोजनेतून मदत देण्यात आल्याने त्यांची दिवाळीही गोड होणार आहे. तसेच जिल्ह्यात गरजू लाभार्थ्यांना १६ हजार घरकुले दिली आहेत. अन्न सुरक्षा कायद्यामुळे समाजातील कोणताही घटक आता अन्नाविना उपाशी राहणार नाही याची दखल शासनाने घेतली आहे. आवश्यक आरोग्य सुविधा शासन पोहोचवत आहे, मात्र जिल्ह्यात गंभीर आजारी रुग्णांवर आता राजीव गांधी आरोग्य योजनेमुळे उपचार करणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी सांगितले.
पेयजल योजनेतून ७० लाख रुपये इर्ला गावासाठी मंजूर करण्यात आले आहे. गावक-यांनीही लोकवाटा भरुन या योजनेचा लाभ मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी दर्शन कोळगे, गणपत कांबळे, अशोक शिंदे, नवनाथ क्षीरसागर, विष्णू चौरे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.