बीड :- मेहनत, दारिद्रय, पोटाला अन्न नाही, रहायला घर नाही, संसार उघड्यावर, दिवसभर लोखंडावर हातोडा आपटायचा, पैसा नाही, सहकार्य नाही, या सर्व समस्यांचा सामना करत बायका-पोरांसह मध्यप्रदेशहून आलेले 16 जणांचे राजपूत लोहाराचे कुटूंब आपली दिवाळी बीड शहरातील जालना रोडवर लोखंड व हातोडा यांच्या सोबत दनकट आवाज करत साजरी करत होते.
मिठ्ठूलाल सोळंके राजपूत. मुळचे मध्यप्रदेश राज्यामधील धार जिल्ह्यातील बदनापूर येथील हे कुटुंब. मध्यप्रदेश मध्ये हाताला काम नाही, त्यामुळे पैसाही नाही, बसून खाण्याइतपत जमीनही नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतीत उपयोगी पडणारे साहित्य बनवण्याचे काम हाती घेतले. हे बनविलेल्या साहित्याचे जेवढे पैसे मिळतील, तेवढयातच आपले कुटुंब जगवायचे हे त्यांचे नितीनियमाचेच ठरलेले असते.
राजपुत यांच्यासारखेच कितीतरी लोक आज आपली दिवाळी रस्त्यावर काम करुन, भीक मागूनख् भंगार गोळा करुन, पेपर विकून साजरी करत आहेत. काही लोकांना तर दिवाळी कधी आली हेच माहित नाही. हे लोक त्यांच्या कामात एवढे मग्न असतात की, त्यांना या समाजात काम चालले आहे, याच्याशी काहीही घेणेदेणे नसते, ते फक्त आपण भले आणि आपले काम भले, याच विचारात गुंतलेले असतात.
शनिवार दि. 2 ऑक्टोबर हा दिवस नरक चतुर्दशीचा, दिवाळीचे पहिले अभ्यंगस्नान. पहाटे चार वाजल्यापासून अभ्यंगस्नान करुन अनेकजण फटाके फोडत होते. सर्वत्र फटाक्यांचा ठो-ठो आवाज, जवळपास प्रत्येकांच्या अंगावर नवनवीन फॅशनचे कपडे. मात्र राजपूत कुटुंब हे आपल्या बायका-पोरांसह फक्त फाटक्या गोदडीतून हे पाहत होते. सकाळ झाली, सुर्यदर्शनाच्या अगोदार मिठ्ठूलालच्या बायकोने आपल्या हातोड्याचे दर्शन घेतले. आंघोळ नाही, नाष्टा नाही की चहा नाही. लगेच मिठ्ठूलालच्या म्हाता-या बापाने कोळसा टाकून भट्टी पेटवली आणि लगेच ते लोखंड तापवण्याच्या तयारीला लागले. काही मिनिटातच लोखंडाचा तुकडा अगदी लालबुंद झाला होता. हा तुकडा बाहेर काढताच राजपूतच्या बायकोने त्यावर हातोड्याने बदडायला सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटातच राजपूत कुटुंबाने त्या लोखंडाच्या तुकड्याचे रुपांतर आकार देऊन कु-हाडीत केले. याठिकाणी फक्त बघ्यांची गर्दी जमली. खरेदी करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. यावेळी राजपूत कुटुंबातील एका लहान मुलाने 'आई मला कपडे घे' असा हट्ट धरला. असे म्हणताच त्या मातेने त्या बाळाला मार देत कुशित घेतले. त्यावेळेस तिच्या डोळ्यातून अश्रूंचे थेंबही टपकू लागले. मात्र याला काही पर्याय नसल्याने ती फक्त अश्रू पुसण्या पलिकडे काहीच करु शकत नव्हती. यावेळी जमलेल्या बघ्यांच्या गर्दीपैकी काही लोक या महिलेकडे फक्त केविलवाना चेहरा घेऊन एकट पहातच राहिले.
बीड शहरात आता अशा रस्त्यावर फिरुन काम करणा-यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. अशा लोकांना दिवाळी आणि शिमगा दोन्ही सारखेच. सकाळी सात वाजल्यावासून हे कुटुंब कामाला सुरुवात करतात. दिवसभर फक्त चहा आणि पाणी यावर भूक भागवणारे हे कुटुंब संध्याकाळी एकच वेळेस जेवण करतात. ही त्यांना लहानपणापासूनच सवय झाली असल्याचे राजपूत यांनी सांगितले.

* हे साहित्य बनवतात राजपुत कुटुंब
कु-हाड, विळा, छनी, सळई, पहार, खुरपे, फास, औताचे जानवळे, तिफनीचे लोखंडी दात यासारखे शेतीला उपयोगी पडणारे साहित्य हे लोहार कुटुंब बनवतात.

आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून घर सोडले आहे. दुसरे काम नसल्यामुळे हेच काम करुन पोट भरतो. आमचे साहित्य नाही विकले तर काही वेळेस उपाशी पोटी झोपावे लागते. --- मिठ्ठूलाल सोळंके राजपूत