नळदुर्ग :- येथील चावडी चौकात मटका खेळविणार्‍या एकास अटक करून त्याच्याकडून 12 हजार 30 रुपये जप्त करण्यात आले. नळदुर्ग पोलिसांनी मंगळवारी दि. 17 डिसेंबर रोजी ही कारवाई केली.
    बापू दत्तात्रय चव्हाण (रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर) असे अटक करण्‍यात आलेल्‍याचे नाव आहे. बापू चव्‍हाण हा नळदुर्ग येथील चावडी चौकात लोकांकडून पैसे घेऊन मटक्याचे आकडे देत होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल संजय चव्हाण, मोहसीन पठाण, शेख यांनी सापळा रचून चव्हाण याला अटक केली. त्याच्याकडून 12 हजार 30 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
 
Top