उमरगा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरुन हैद्राबादकडे काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा ८० पोती गहू उमरगा पोलिसांनी पकडला असुन उमरगा पोलिसांनी पकडला असुन एकुण २ लाख ८० हजाराचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
      शासकीय वितरणासाठीच्या रेशनचा गहू एका टॅम्पोमध्ये हैद्राबादकडे काळ्याबाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती गुप्तहेरामार्फत उमरगा पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवार दि. १६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास उमरगा पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला. यावेळी येणेगुरहून हैद्राबादकडे भरधाव वेगात निघालेला टॅम्पो (क्र.एम.एच.११ ए. ३३००)हा जात असल्याचे पोलिसांना दिसले.
       त्यावेळी येळी गावाजवळ पोलिसांना चुकवून टॉम्पो चालकाने गाडी रोडवर थांबवून अंधाराचा फायदा घेवून टॅम्पो चालक पसार झाला. पोलिसांनी टॅम्पोची तपासणी केली असता, टॅम्पोमध्ये मध्यप्रदेश स्टेट सिव्हील सप्लायर कॉर्पोरेशनची छापाई असलेला ८० पोती गहू आढळून आला.
     याबाबत उमरगा पोलीस ठाण्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामहारी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन या प्रकरणाचा अधिक तपास पो.नि. नागरगोजे हे करत आहेत.
 
Top